Mid term Election in Maharashtra : राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार? काय म्हणतात नेते?

Continues below advertisement

राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील, असा अंदाज विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांत सातत्यानं व्यक्त करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापासून महाविकास आघाडीतील लहानमोठे अनेक नेते मध्यावधी निवडणुका लागण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. पण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तोच सूर आळवला आहे. जानेवारी महिन्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं विधान राज ठाकरेंनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर  राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लावा आणि निवडणुका घ्या असं विधान केलंय. पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत असं म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram