Shooting In Goa :महाराष्ट्रातल्या लोकांनी गोव्यात शूट करावं की नाही? शूटसाठीच्या अटी शर्थी काय आहेत?
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
06 May 2021 11:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमडगाव : देशभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाच कैक राज्यांनी स्थानिक पातळीवर लॉकडाऊनचे निर्णय घेतले आहेत. काही भागांमध्ये सक्तीचा लॉकडाऊन लागू न करता निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. गोव्यातही असंच काहीसं चित्र आहे. गोव्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत असतानाही इथं लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला नाही, उलटपक्षी निर्बंध आणखी कडक करत प्रवाशांची ये-जा आणि अनेक कार्यक्रमांचं चित्रीकरण इथं सुरु आहे.