Sunil Kedar VS Deshmukh : सावनेरमध्ये पुन्हा देशमुखांची सत्ता?, सावनेरच्या जागेवर देशमुखांचा डोळा?

Continues below advertisement

 बंडखोर काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा सुनील केदारांच्या सावनेर मतदारसंघावर डोळा आहे की काय, असा प्रश्न पडतोय.. कारण आशिष देशमुख यांनी त्यांचे वडील रणजीत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त, 29 मे रोजी सावनेर मध्ये अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. सावनेर हा रणजीत देशमुख यांचा जुना मतदारसंघ असून सुनील केदार यांच्या पूर्वी रणजीत देशमुख हेच सावनेरचे आमदार होते. 1996 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून सुनील केदार यांनीच रणजित देशमुख यांचा पराभव केला होता. यामुळे सावनेरमधील देशमुख कुटुंबीयांची सत्ता खालसा झाली होती. २०२४मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख हे सुनील केदार यांच्याविरोधात उभे राहणार का, ते पाहावं लागेल. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे सावनेरचं राजकारण आगामी काळात कुठलं वळण घेतं ते पाहायचं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram