Vitthal Rukmini Temple :विठुरायाच्या मंदिरातील द्राक्षांचे शेकडो घड कोणी पळवले, चौकशी करण्याची मागणी

Continues below advertisement

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात द्राक्षांच्या सजावटीनंतर, सकाळी सहाच्या सुमारास भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात आलं होतं. आणि आश्चर्य म्हणजे केवळ अर्ध्या तासात एक टन द्राक्षांमधलं एकही द्राक्ष शिल्लक राहिलं नव्हतं. दर्शनाला आलेल्या भाविकांनी ही द्राक्षं खाल्ल्याचा दावा करण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात दर्शन रांगेच्या बाहेर लावण्यात आलेले द्राक्षांचे शेकडो घड कोणी पळवले याची चर्चा सुरू आहे. द्राक्ष पळवणं हा विषय छोटा असला तरी मंदिरात ज्या पद्धतीनं हा प्रकार घडला, त्याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram