Shaina NC : टीकेमध्ये माल, अरविंद सावंतांवर आरोप करण्याऱ्या शायना एनसी कोण?

Continues below advertisement

Shaina NC : टीकेमध्ये माल, अरविंद सावंतांवर आरोप करण्याऱ्या शायना एनसी कोण?

उद्धव बाळसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दकाहल करण्यात आला आहे. महायुतीच्या आणि शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खासदार अरविंद सावंत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांचा इम्पोट्रेड माल असा उल्लेख केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. अखेर शायना एनसी यांच्या तक्रारीनंतर नागपाडा पोलीस ठाण्यात खासदार अरविंद सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर शायना एनसी यांनी महाविकास आघाडीचा उल्लेख महाविनाश आघाडी करत जोरदार टीका केली आहे. तसेच याप्रकरणाची मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे शायना एनसी यांनी सांगितले आहे. मात्र आता आता अरविंद सावंत यांच्या अशा वक्तव्यामुळे राजकरण चांगलेच तापले आहे. भाजपने देखील यावर आपली भूमिका मांडली आहे.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram