Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझा
Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझा
ही बातमी पण वाचा
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाती धर्माच्या नावाने मतांचे ध्रुवीकरण होत असल्याचे यापूर्वी अनेकदा पाहायला मिळाले आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीतही भाजपाकडून (BJP) देण्यात आलेल्या काही घोषणा आणि मुस्लीम मौलवींच्या वक्तव्यावरुन मतदारांना धार्मिकतेच्या आधारावर मतदाना करण्याचे आवाहन केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, व्होट जिहादचा मुद्दाही चांगलाच निवडणुकीत चर्चेत आला आहे. त्यातच, उत्तर प्रदेशातील मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं महाविकास आघाडीला (MVA) आपला पाठिंबा जाहीर केला असून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली होती. महाराष्ट्रात मविआच्या 269 उमेदवारांना त्यांच्याकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर, आता महाराष्ट्रच नाही तर दिल्ली सरकारही पाडण्याचं लक्ष्य असल्याचं सांगत भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांचा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.
नोमानी यांनी मविआसह वंचित, एमआयएम, सपा, बविआ आणि अपक्ष उमेदवारांनादेखील पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, आता त्यांचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, केवळ महाराष्ट्रच नाही, तर महाराष्ट्रात सरकार गेल्यानंतर दिल्लीतील सरकारही पडणार असल्याचं नोमानी यांनी म्हटलं आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ट्विटर अकाऊंटवरुन नोमानी यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. एक एैसा व्होट जिहाद करो... असे म्हणत शेलार यांनी नोमानी यांनी मुक्ताफळे उधळल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, राज्यातील विधानसभा निवडणुकांचा मुद्दा विकासाकडून भरकटत असल्याचं पाहायला मिळतआहे.
दरम्यान, सज्जाद नोमानी यांनी काही दिवसांपूर्वी मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची दोनदा भेट घेतली होती. मराठा, दलित आणि मुस्लिमांची मोठ बांधून उमेदवार उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण मुस्लिम, दलित समाजाच्या उमेदवारांची यादीच न आल्यानं आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानंतर, सज्जाद नोमानी यांनी आपली भूमिका जाहीर करत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.