Who Is Prataprao Jadhav | Buldana Lok Sabha | Narendra Modi | सलग 4 वेळा खासदार! कसा आहे प्रतापराव जाधवांचा राजकीय प्रवास

Who Is Prataprao Jadhav | Buldana Lok Sabha | Narendra Modi | सलग 4 वेळा खासदार! कसा आहे प्रतापराव जाधवांचा राजकीय प्रवास

प्रतापराव जाधव यांनी अगदी सरपंचपदापासून सुरुवात करत खासदारकीपर्यंतची झेप घेतली आहे. 

मेहकर तालुक्यातून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. 

त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. 

25 नोव्हेंर 1960 रोजी प्रतापराव जाधव यांचा मेहकर येथे जन्म झाला. 

सुरुवातीपासून प्रतापरावांना राजकारण आणि समाजकारणात रुची होती. 

बुलढाणामधील चिखलीत शिवाजी कॉलेज येथे त्यांचं शिक्षण झालं. त्यांचं शिक्षण बीए दुसऱ्या वर्षांपर्यंतच झालेले आहे. 

प्रतापराव जाधव यांचा विवाह 1 एप्रिल 1983 रोजी राजश्री यांच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

1990-1995 सालात प्रतापराव जाधव हे खरेदी विक्री समिती मेहकरकमध्ये सभापती राहिलेत.

1992-95 साली प्रतापरावरावांनी पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम पाहिलं.

1995-2015 साली प्रतापरावरावांनी जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचं संचालक पदी दमदार कामगिरी केली.

1995 मध्ये प्रतापराव पहिल्यांदा बुलढाण्याचे आमदार झाले. 

1995-2009 सालात सलग तीन टर्म प्रतापरावांनी आपली आमदारकी राखली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola