White Lotus Bloom Sindhudurg : वेंगुर्लेमधील आरवली गावात पांढऱ्या कमळांना बहर
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील आरवली गाव हे कमळांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तळकोकणातील या गावात पाणथळ भागात पांढऱ्या कमळांचा बहर पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात कमळ फुलण्याचा काळ असतो. कमळांचे लांबच लांब मळे एखाद्या चादरीप्रमाणे फुलले आहेत. रेडीरेडस सागरी मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष या कमळांनी वेधून घेतले आहे. पांढऱ्या कमळांनी फुललेले हे मळे पाहण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पर्यटक या ठिकाणी थांबून फोटो आणि सेल्फी काढत आहेत. आरवली गावचे ग्रामदैवत वेतोबाला, जे प्रतिबालाजी म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांना याच पांढऱ्या कमळाच्या फुलांचा अंगारखा बनवून घातला जातो. या पांढऱ्या फुलांचे महत्त्व या गावात मोठे आहे. आरवलीत ठिकठिकाणी कमळांचे मळे फुललेले दिसत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement