Maharashtra Lockdown राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन? काय आहेत निर्बंध?

Continues below advertisement

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनसंबंधी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी  15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून नये, असं आवाहनही नितीन राऊत यांनी केलं आहे. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram