Shivsena at Election Commission : निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय होणार? 'माझा'च्या हाती माहिती

Continues below advertisement

शिवसेनेतल्या ठाकरे आणि शिंदे गटांमधली धनुष्यबाण चिन्हासाठीची लढाई निवडणूक आयोगात पोहोचली आहे. शिंदे गटानं ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करून, त्या चिन्हावर दावा केला आहे. शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे आज कागदपत्रं आणि कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्रं सादर करण्यात आली. या दाव्याची तातडीनं दखल घेऊन निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत कागदपत्रं सादर करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळं ठाकरे गटाकडून उद्या किती आणि कसे पुरावे सादर करण्यात येणार याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यात अंधेरीतल्या विधानसभा पोटनिवडणुकीआधी शिवसेनेचं चिन्ह कोणत्या एका गटाला मिळणार याविषयी फैसला येणार की ते चिन्ह गोठवलं जाणार याविषयी अधिक उत्सुकता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram