Fadanvis Raj Thackeray Meet: फडणवीस राज ठाकरेंमध्ये काय झाली चर्चा? ABP Majha
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दीड तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी फडणवीस यांचं स्वागत करण्यात आलं. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी फडणवीस यांचं औक्षण केलं. तर राज ठाकरे यांनी फडणवीस यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी नेते उपस्थित होते. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना पत्र लिहून अभिनंदन केलं होतं.
Tags :
Devendra Fadnavis Raj Thackeray Bala Nandgaonkar Deputy Chief Minister MNS President Nitin Sardesai Mns Leaders Shivtirtha Residence Wife Sharmila Thackeray Aukshan Pushpaguch