lockdown | लॉकडाऊनच्या धास्तीचे असेही परिणाम...
कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत संपूर्ण लॉकडाऊनचा इशारा दिला. मुख्यमंत्र्यांनी याची अधिकृत घोषणा केलेली नसली तरीही त्यांनी दिलेला इशारा पाहता राज्यातील कोरोना परिस्थिती किती गंभीर वळणावर पोहोचली आहे हेच स्पष्ट होत आहे. लॉकडाऊनच्या याच धास्तीचे थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर आणि उद्योगधंद्यांवर दिसून येऊ लागले आहेत. नागरिकांमध्ये असणारी सजगता ही आणखी मोठ्या प्रमाणात दिसून आल्यास आणि कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन झाल्यास लॉकडाऊन दूर लोटता येणं शक्य आहे. पण, त्यासाठी नागरिकांनीच जबाबदारीनं वागणंही तितकंच महत्त्वाचं आहे.