What Is Whip : पक्षाचा व्हिप म्हणजे काय? ज्यमुळे शिवसेना अडचणीत, व्हीप मानला नाही तर काय होणार?

Continues below advertisement

महाराष्ट्रात सत्तांतर झालंय. ठाकरेंचं सरकार जाऊन आता शिंदे सरकार आलंय. गेल्या पंधरा दिवसात एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट असल्यासारख्या गोष्टी घडतायत. आपल्यापैकी कुणीच या सत्तानाट्याचा विचारदेखील केला नसेल. एखादा मोठा पक्ष फुटतो, २-४ डझन आमदार फुटतात तेव्हा ती साधी गोष्ट नक्कीच नसते आणि अशातच कोणत्याही पक्षासमोर कायदेशीर संख्याबळाचा पेच पडणार हे स्वाभाविक आहे. त्यात ज्यांनी बंड केलंय असे शिवसेनेचे आमदार बंड केल्यानंतरसुद्धा आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत असं वारंवार सांगतायत. म्हणजे बंड तर केलाय पण आम्ही शिवसेनेसोबत एकनिष्ठ पण आहोत. आता या परिस्थित कायदेशीर रित्या दोन्ही बाजूच्या लोकांनी आपली लढाई लढायला सुरुवात केलीये. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram