NCP Pawar Meetings : राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय काय? अजितदादा गटाकडून पवारांची मनधरणी
abp majha web team
Updated at:
17 Jul 2023 08:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं पहिल्या दिवसाचं कामकाज आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटाचे आमदार पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरवर दाखल झाले. शरद पवारांना अजित पवार गटाच्या आमदारांच्या या भेटीची पूर्वकल्पना नसल्याचं सांगण्यात आलं. या आमदारांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेलांनी सांगितलं. तसंच आमदारांनी पक्ष एकसंध ठेवण्याचीही विनंती पवारांना केल्याचं पटेलांनी सांगितलं.