Rajkot fort : भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून कोणत्या गोष्टी आवश्यक? शिल्पकारांची माहिती
Rajkot fort : भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून कोणत्या गोष्टी आवश्यक? शिल्पकारांची माहिती
मालवण मधील राजकोट किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रेझेंटेशन सादर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी १०० कोटी खर्च करून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. शिवसृष्टी उभारण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या बाजूची सुमारे १६७ गुंठे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे, ती जागा पर्यटनासाठी आरक्षितही आहे. त्यामुळे तिथे शिवसृष्टी उभारली जाणार, त्याठिकाणी पार्किंगचीही व्यवस्था करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहासप्रेमींना पाहता येणार आहे. त्याठिकाणी फिश अॅक्वेरिअम आणि म्युझियम असणार आहे. त्याठिकाणी जेटी उभारली जाणार आहे. त्यावरून बोटीने थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येणार आहे. या शिवसृष्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरिम मंजूरी दिली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याना त्याच सादरीकरण करण्यात येईल. ते लवकरात लवकर होईल.