What is Gregorian Calendar ? 1 जानेवारीला बदलणाऱ्या कॅलेंडरची कहाणी
1 जानेवारीला नव्या वर्षाची सुरूवात करण्याची पद्धत 15 ऑक्टोबर 1582 पासून सुरू झाली. त्या आधी काही दिवस 25 मार्चला तर नंतर 25 डिसेंबरला नवं वर्षाची सुरूवात केली जात होती. रोमचे राजा नूमा पोंपिलस यांनी रोमन कॅलेंडरमध्ये बदल केला. त्यांनी जानेवारी हा वर्षाचा पहिला महिना केला. त्याआधी लोक मार्च महिना हा वर्षाचा पहिला महिना म्हणून साजरा करत होते. मार्च या महिन्याचे नाव मार्स (mars)या ग्रहावरून ठेवण्यात आले आहे. मार्स म्हणजेच मंगळ ग्रहाला रोममधील लोक युद्धाचा देव मानत असत.