आमदार राम कदम यांचा कलादिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्येशी काय संबंध? राम कदम यांची काय प्रतिक्रिया?

अगोबाई सूनबाई, काय घडलं त्या रात्री, मन्या द वंडर बॉय, साटंलोटं, राजधानी एक्स्प्रेस आदी चित्रकृतींचे कलादिग्दर्शक राजू सापते यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ करून त्यांनी हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहोत याचं कारण दिलं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत असल्याचं कारण देत आपल्या समोर आता काहीच पर्याय उरला नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या व्हिडिओमुळे मराठी मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola