What Happened In Irshalwadi Specail Report : एक होती इर्शाळवाडी... इर्शाळवाडीत नेमकं काय झालं?
Continues below advertisement
इर्शाळवाडी... पन्नासएक घरांचं टुमदार गाव... सुमारे दोनशे माणसं राहत होती... कुणी भातशेती करत होतं... कुणी ट्रेकर्सला लागणाऱ्या वस्तूंची विक्री करत पोट भरत होतं... कुणी जवळच्या शहरांत छोटी-मोठी नोकरी करत होतं... तर कुणी शाळा कॉलेजात जात होतं... तीही पाच किलोमीटरची वाट तुडवत... काट्याकुट्यातून... चिखल रेंध्यातून... वाडीत कौलारू घरं... या वाडीचा रहाटगाडा ज्याच्या साक्षीनं चालला होता आणि ही वाडी ज्याच्या कुशीत विसावली होती... त्याच इर्शाळगडानं काल रात्री वाडीला कवेत घेतलं... आणि होत्याचं नव्हतं झालं... आणि प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य आलं... एक होती इर्शाळवाडी...
Continues below advertisement