Param Bir Singh : परमबीर सिंह यांच्या चौकशी दरम्यान नेमकं काय झालं?

Continues below advertisement

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ७ तास चौकशी केली. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. विमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे..
परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन सचिन वाझे हे खंडणी गोळा करत होते असा आरोप अग्रवाल यांनी केला होता. याच प्रकरणात आज परमबीर सिंह यांची चौकशी करण्यात आली..आज सकाळी ११ च्या सुमारास परमबीर सिंह कांदिवली गुन्हे शाखेत हजर झाले..संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास परमबीर यांची चौकशी संपली. दरम्यान परमबीर सिंह चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परमबीर सिंह यांना गुन्हे शाखेकडून पुन्हा चौकशीला बोलावण्यात येण्याची शक्यता आहे..परमबीर सिंह उद्याच चांदीवाल आयोगासमोरही हजर राहण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram