
Thackeray VS Shinde : सत्तासंघर्षातील न्यायामूर्तींच्या खंडपीठाबाबत मुख्यमंत्री- राऊत काय म्हणतात?
Continues below advertisement
राज्यातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी तूर्तास ५ न्यायमूर्तींचंच घटनापीठच करणार आहे.... ठाकरे गटानं यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. आणि हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करावं अशी विनंती घटनापीठाकडे केली होती.. या प्रकरणावर गेले तीन दिवस सलग सुनावणी झाली अखेरीस न्यायालयानं या प्रकरणावर आज निर्णय सुनावला.. तूर्तास हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवलं जाणार नाही... २१ फेब्रुवारीपासून याबाबत सुनावणी सुरू होईल. त्या दरम्यान नबाम रेबिया प्रकरणाच्या गुणवत्तेवर या सुनावणीदरम्यान चर्चा होणार आहे... या चर्चेत केवळ राज्यातलाच सत्तासंघर्ष नव्हे तर भविष्यात अशी स्थिती उद्भवल्यास अशी प्रकरणं मोठ्या घटनापीठाकडे पाठवावी अथवा नाही याबाबत सुनावणीदरम्यान चर्चा होणार आहे.
Continues below advertisement