Lockdown 2.0 दुसरा लॉकडाऊन कसा असेल? कोणत्या गोष्टींवर निर्बंध असणार? 'हे' असू शकतात लॉकडाऊनचे नियम
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज विक्रमी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळ सर्वांनाच एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, लॉकडाऊन सध्या कुणालाच नको आहे. पण परिस्थिती येते तेव्हा तहान लागल्यावर विहीर खोदू शकत नाही. लॉकडाऊन ऐनवेळी लावणे शक्य नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.
Tags :
Mumbai Lockdown Guidelines Lockdown Lockdown In Maharashtra Maharashtra Lockdown Lockdown In Maharashtra