What is Lumpy Disease : लम्पी आजाराची लक्षणं काय? पशुपालकांनी काय काळजी घ्यावी? Special Report
Lumpy Virus Cases : राज्यातील जळगांव (Jalgaon), अहमदनगर, अकोला (Akola), पुणे, धुळे (Dhule), लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा, अमरावती, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, कोल्हापूर (Kolhapur) तसेच नाशिक जिल्ह्यांतील काही भागात सद्यस्थितीत गाय वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नाशिक (Nashik) यांचेमार्फत जिल्हा परिषद सेस निधीतून सध्या 1,05,300 गोट पॉक्स लस (Goat Pox Vaccine) मात्रा तातडीने उपलब्ध करण्यात आलेली आहे.