Cross Voting Rajyasabha : राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यास कोणती कारवाई ? ABP Majha
राज्यसभा निवडणुकीत फाटाफुट होऊ नये म्हणून सत्ताधारी आघाडी आणि विरोधी भाजप अशा दोन्ही बाजूंनी खबरदारी घेतली जातेय. अशा वेळी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास आमदार अपात्र ठरत नाही, अशी माहिती निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या याआधीच्या निकालात समोर आलीय. असं असलं तरी मतदानानंतर पक्षाच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवण्याचं आमदारांवर बंधन असतं. त्यावेळी क्रॉस व्होटिंग केल्याचा आक्षेप प्रतिनिधींनी घेतला तर निवडणूक अधिकारी ते मत बाद ठरवू शकतो, असा निर्वाळा तज्ज्ञांनी दिलाय.
Tags :
BJP Election Commission Opposition Polling Rajya Sabha Election Ballot Papers BJP Ruling Alliance Cross Voting