Web Exclusive | हॉटस्पॉट असलेल्या गावात निर्बंध आणखी कठोर करण्याचा विचार : दिलीप स्वामी

सोलापुरातील जे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत तिथे निर्बंध आणखी कठोर करण्याचा विचार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. मात्र या संदर्भातील अंतिम निर्णय राज्यशासन घेईल असं देखील दिलीप स्वामी म्हणाले. राज्यातील 11 जिल्ह्यामधील निर्बंध अद्याप ही शासनाने शिथिल करण्यात आलेले नाहीत. सोलापुरात देखील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा जवळपास 5 टक्के इतका आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा या तालुक्यात कोरोनाचे आढळत आहेत. सीमेवरील तालुके असल्याने लोकांची आवकजावक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत असल्याची शक्यता आहे. ज्या गावामंध्ये रुग्ण संख्या जास्त आहे तिथे निर्बंध आणखी कठोर करावे लागतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola