Web Exclusive : दर कोसळल्यानं टोमॅटो उत्पादक आक्रमक; उत्पादकांकडून किसान सभेचं आंदोलन : ABP Majha
Continues below advertisement
दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक आक्रमक झाले असून डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली किसान सभेचे आंदोलन करण्यात आलं आहे. अकोले तालुक्यातील समशेरपूर बाजार समितीत आंदोलन करण्यात येत आहे. एकरी 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी, यावेळी टोमॅटो उत्पादकांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांच्या दारात टोमॅटो फेकण्याचा इशारा टोमॅटो उत्पादकांकडून देण्यात आला आहे.
Continues below advertisement