WEB EXCLUSIVE : लाखो कोविड रूग्णांचे पॅाझिटिव्ह सॅंपल अजूनही लॅबमध्ये ABP Majha

Continues below advertisement

कोविंड रुग्णांच्या पॉझिटिव्ह टेस्टिंगचे सॅम्पल जतन करून ठेवण्यात संदर्भात महाराष्ट्रात धोरणामध्ये गोंधळ दिसतो आहे. महाराष्ट्रातल्या शासकीय लॅब आणि खाजगी लॅब आरटीपीसीआर लॅब मध्ये गतवर्षीपासून आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या सर्व रुग्णांचे सॅंपल जतन करून ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे लॅब मध्ये covid-19 रुग्णांचे पॉझिटीव्ह सॅम्पल्स कुठे ठेवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. उस्मानाबाद सारख्या १७ लाख लोकसंख्या असलेल्या छोट्या जिल्ह्याच्या covid-19 टेस्टिंग लॅब मध्ये गतवर्षी जून पासून आत्तापर्यंतचे 14 हजार पॉझिटिव रुग्णांचे सॅम्पल सध्या एका फ्रीजमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. संपूर्ण राज्यामध्ये आज पर्यंत सुमारे 63 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. तेवढे सगळे संपल्स प्रत्येक सरकारी लॅब मध्ये साठा करून ठेवण्यात आलेले आहेत. यापैकी काही सॅम्पल्स चे नमुने आरएनए वेगळा करून दिल्लीच्या संस्थेकडे नवीन कोरोना प्रकार आला आहे का हे तपासण्यासाठी पाठवण्यात येतात. परंतु लाखोच्या संख्येने असलेले पॉझिटिव्ह सॅंपलचे भविष्यात काय करायचं ?  किती काळ ठेवायचे याबद्दल कुठलीच मार्गदर्शक तत्त्व सध्या कुणाकडेच नाहीत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram