WEB EXCLUSIVE : महाराष्ट्रात शाळा सुरु करायला हव्यात? तज्ज्ञांना काय वाटतं?
कोरोनाच्या डेल्टा प्रकारामुळे भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. पण कोरोनाच्या या प्रकाराबद्दल इंग्लंडमधून अतिशय सकारात्मक माहिती आली आहे. इंग्लंड मध्ये 2 लाख 71 हजार रुग्णांचं जीनोम स्क्विन्सिंग केलं गेले आहे. कोरोनाच्या डेल्टा प्रकारामुळे हे रुग्ण आजारी होते. या तपासणीतून असं लक्षात आलं की कोरोनाता डेल्टा प्रकार जरी वेगानं संसर्ग पसरवत असला तरी यामुळे दहा लाख लोकसंख्येमागे 248 जणांचा मृत्यू होतो. पण यापूर्वीचा कोरोनाच्या अल्फा प्रकारामुळे दहा लाख रुग्णा मागं 1902 रुग्णांचा मृत्यू होत होता. कोरोनामुळे गेल्या वर्षभरामध्ये इंग्लंडमध्ये लहान मुलांचा एकही मृत्यू झालेला नाही. दूरचित्रवाणी मध्ये बाल रोग तज्ञ डॉक्टर महेश कात्रे आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून संशोधक डॉक्टर नानासाहेब थोरात यांच्याशी संवाद. यांच्या मते महाराष्ट्रात शाळा सूरू करायला हव्यात