Web Exclusive | पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं, त्या आमच्या भगिनी आहेत : गुलाबराव पाटील
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम केला. आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावर भाजपमध्ये अनेक नेत्यांवर अन्याय होतोय, त्यात पंकजा मुंडेही आहेत. त्यामुळे पंकजा यांनी शिवसेनेत येण्याची विनंती गुलाबराव पाटील यांनी केली आहे. आता आवाहनाला पंकजा मुंडे कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.