WEB EXCLUSIVE | महाराष्ट्रात 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान पहिल्यांदाच साजरा होतोय पक्षी सप्ताह

साहित्यिक मारूती चितमपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त आणि डॉ सलीम अली यांच्या  जयंतीनिमित्त ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान शासनाकडून राज्यात प्रथमतः पक्षी सप्ताह साजरा केला जातोय. त्यानिमित्त आज अमरावतीच्या वडाळी तलाव, बांबूगार्डन येथे वनविभागाच्या वतीने पक्षी निरीक्षण, निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ ते ९ वाजता वडाळी तलाव, बांबू गार्डन परिसरात वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील, डॉ. जयंत वडतकर, गजानन वाघ यांच्या उपस्थितीत पक्षी निरीक्षण, निसर्ग भ्रमंती झाली. 5 ते 12 नोव्हेंबर पर्यंत अमरावती जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून याचा पक्षीप्रेमीनी लाभ घ्यावा असे आवाहन वनविभागाने केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola