Maharashtra Monsoon Prediction : राज्यात मान्सून लवकरच येणार? हवामान खात्याचा अंदाज काय?

Continues below advertisement

यंदा राज्यात उन्हाचा तडाखा जास्त आहे.. तसंच मुंबईत आर्द्रता असल्याने उकाड्यानं मुंबईकर चांगलेच हैराण झालेत. . मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा खाली येत असला तरी उष्णतेच्या झळा अजूनही कायम आहेत. त्यातच आता राज्यात मान्सून लवकरच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच राज्यातील काही भागात उद्या मान्सूनपूर्व पाऊस म्हणजेच वळवाचा पाऊस येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवलीये..महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केलीये.. एकीकडे हवामान खात्याकडून देशातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच दुसरीकडे काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा तडाखा बसणार असल्याचीही शक्यता आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram