Weapon License Controversy | Yogesh Kadam यांच्या शस्त्र परवान्यावरून खळबळ, 'मोठ्या व्यक्ती'चे नाव CM कडे?
Continues below advertisement
ठाकरे सेनेचे आमदार अनिल कदम यांनी पितापुत्रांना धारेवर धरल्यानंतर रामदास कदमांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. नीलेश भायबल्ला यांना दिलेल्या शस्त्र परवान्यावरून रामदास कदमांनी थेट राम शिंदेंकडे अंगुलीनिर्देश केला आहे. योगेश कदमांनी शस्त्र परवान्याचा घेतलेला निर्णय एका मोठ्या नेत्याच्या सूचनेवरून घेतल्याचा दावा रामदास कदमांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. रामदास कदमांनी त्या 'मोठ्या व्यक्ती'चे नाव घेण्यास नकार दिला, परंतु ते म्हणाले की, "आता नाव घ्यायचं नाहीत. त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवते. त्या व्यक्तीचं नाव-- मोठी व्यक्ती आहे. आर्थिक पदावर बसलेले, उच्च आस्थावर बसलेली व्यक्ती आहे. मी नाव घेणार नाही त्याचं." या दाव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, या 'मोठ्या व्यक्ती'च्या नावाबाबत उत्सुकता वाढली आहे. योगेश कदमांनी मुख्यमंत्र्यांकडे नाव पाठवल्याचे रामदास कदमांनी स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement