Devendra Fadnavis on Eknath Shinde : 2024च्या निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वात लढू : देवेंद्र फडणवीस
राज्यात ऐतिहासिक बंडखोरी होऊन शिवसेनेतून फुटलेला गट भाजपसोबत आला आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं... त्यांच्या सरकाराला १० महिनेही पूर्ण झालेत. पण, गेल्या महिन्याभरात राज्यात अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय. त्यात सर्वात मोठी चर्चा सुरु आहे, ती म्हणजे सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर महाराष्ट्रात नवं राजकीय गणित दिसू शकतं.. इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपला नकोसे झालेत..अशाही चर्चा सुरु झाल्यात. पण, त्याच चर्चांना आपल्या शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय... ((इतकंच नाही तर २०२४ च्या निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं)) एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलीय. आरोप केलेत.. ((आज रिफायनरी प्रकल्पामुळे बारसू तापलंय... यावर बोलताना फडणवीसांनी बारसूत रिफायनरीला विरोध करणारे सुपारीबाज असल्याचा आरोप फड़णवीसांनी केलाय... शिवाय उद्धव ठाकरेंची बारसूबाबत भूमिका ही दुटप्पी असल्याचंही ते म्हणाले... पाहुयात आ ))पाहुयात.. प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी घेतलेली देवेंद्र फडणवीसांची स्फोटक मुलाखत