Imtiyaz Jaleel : एसीपी विशाल ढुमे प्रकरणी पोलीस आयुक्त कार्यालयावर देखील मोर्चा काढू :इम्तियाज जलील
औरंगाबादमधील क्राईम ब्रँचला कार्यरत असलेल्या एसीपी विशाल ढुमे यांच्यावर विनयभंगाचा एका महिलेनं आरोप केलाय... त्यानंतर आता या प्रकरणात एक नवा व्हिडीओ समोर आळाय.. ज्यात त्या रात्री विशाल ढुमे हे कोणत्या अवस्थेत होते हे दिसून येतंय... तर दुसरीकडे आता विशाल ढुमेंना निलंबित न केल्यास शुक्रवारी शहर बंदचा इशारा देण्यात आलाय... पोलीस आयुक्त कार्यालयावर देखील मोर्चा काढू असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय...