Sangli Protest : सांगलीत ऐन दिवाळीत पाणीबाणी, नागरिकांचा पालिकेवर संताप
Continues below advertisement
सांगली (Sangli) शहरात ऐन दिवाळीत पाणीपुरवठा (Water Supply) खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अभ्यंगस्नानाच्या दिवशीच पाणी नसल्याने संतप्त नागरिक आणि माजी नगरसेवकांनी सांगली महापालिकेच्या (Sangli Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागासमोर रिकाम्या बादल्या घेऊन ठिय्या आंदोलन केले. 'हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी आहे आणि याच दिवशी अखंड सांगलीमध्ये पाण्याचा थेंब सुद्धा नाहीये,' असा उद्विग्न सवाल आंदोलकांनी केला. महापालिकेच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीच्या कामामुळे हा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मात्र, सणाच्या दिवशी प्रशासनाने कोणतेही नियोजन न केल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने टँकरचीही सोय न केल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला असून, त्यांनी थेट आयुक्तांना जबाबदार धरले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement