Washim Murder | वाशिमच्या उंबर्डा परिसरात तरुणीचा गूढ मृत्यू, जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

Continues below advertisement
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार परिसरात एका अज्ञात तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह काल आढळून आला. रस्त्यावर कडेलाच 20 ते 25 वयोगटातील तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह गुराख्यांना आढळला. 
घटनास्थळापासून काही अंतरावरच रक्ताने माखलेला दगड सापडला तर बाजूलाच झाडाच्या झुडुपात तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. घटनास्थळाला यवतमाळच्या दारव्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी चंदेल तथा ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी भेट दिली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram