Washim News : प्रशिक्षण, शेतमाल विक्री केंद्राची इमारत झालीय पांढरा हत्ती

Continues below advertisement
वाशिममधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि शेतमाल विक्री केंद्र बंद पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सहा कोटी रुपये खर्चून बांधलेली ही इमारत आता 'पांढरा हत्ती' ठरत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या केंद्राचे भूमिपूजन केले होते, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले होते. मात्र, आता हे केंद्र बंद पडले असून, महिन्यातून एखादेच प्रशिक्षण येथे होते आणि कोल्ड स्टोरेज व शेतमाल विक्री केंद्र पूर्णपणे बंद आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे, त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हा होता, पण आता हा प्रकल्पच संकटात सापडला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola