Washim Rain | सोनाळा प्रकल्प तुडूंब, पाणी-सिंचनाची चिंता मिटली
वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. या पावसानं जिल्ह्यातील सोनाळा प्रकल्प पूर्णपणे तुडूंब भरला आहे. प्रकल्पात पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या दूर झाली आहे. पुढील वर्षासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आता निश्चित झाली आहे. यासोबतच, शेतीसाठी आवश्यक असलेल्या सिंचनाच्या पाण्याची चिंताही मिटली आहे. प्रकल्पात पुरेसे पाणी असल्याने रब्बी हंगामातील पिकांना मोठा आधार मिळणार आहे. यामुळे स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाशिम जिल्ह्यातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने पाणी व्यवस्थापनास मदत होणार आहे.