Washim : भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरावरुन नवा वाद, आज बोलावलेली बैठक निष्फळ
Continues below advertisement
Washim : भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरावरुन नवा वाद, आज बोलावलेली बैठक निष्फळ
वाशिमच्या शिरपूरच्या जैन धर्मियांच्या दोन्ही पंथीयां सोबत जिल्हा प्रशासनाची बैठक सुरू झाली पण यात काहीच तोडगा निघाला नसल्याने उद्या परत 11 वाजता बैठक होणार आहे. 42 वर्षा नंतर भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिराचे दार उघडे करण्याच्या आदेशा नंतर पुन्हा टाळे लावण्यावरून वाद निर्माण झाला होता. लावलेले टाळे का तोडले या वरून वाद पोलिसात गेला होता. या संदर्भात एबीपी माझाने बातमी दाखवल्या नंतर आता जिल्हा प्रशासन, पोलीस आणि दोन्ही पंथीयांचे शिष्टमंडळ सोबत बैठक झाली. या बैठकीत दिगम्बर आणि श्वेतम्बर पंथीयांचे प्रत्येकी 5 सदस्य आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यासह निवासी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थिती झाली.
Continues below advertisement
Tags :
Washim