Sharad Pawar हिंदूविरोधी, राष्ट्रीय वारकरी परिषदेचा आरोप | ABP Majha

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे हिंदूविरोधी असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय वारकरी परिषदेनं केलाय. पवार हे हिंदू विरोधी आहेत. त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलावू नका असं पत्रकच राष्ट्रीय वारकरी परिषदेनं काढलंय. पवार हे नेहमी हिंदू धर्माला विरोध करतात. पवार नास्तिकवादी मंडळींना पाठिंबा देण्याचं काम करतात. ते रामायणालाही विरोध करतात असा आरोप वक्ते महाराज यांनी पत्रकाद्वारे केलाय.  राष्ट्रीय वारकरी परिषद ही वारकरी सांप्रदायातील एक मोठी संघटना आहे आणि वक्ते महाराज हे हिंदुत्ववादी संघटनांच्या जवळचे मानले जातात. २०१८ साली वक्ते महाराज यांना महाराष्ट्र सरकारचा ग्यानबा तुकाराम हा पुरस्कार देण्यात आला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram