Wardha Woman Ablaze | न्यायालयात पीडितेची बाजू उज्जवल निकम मांडणार : गृहमंत्री | ABP Majha
Continues below advertisement
वर्धा जळीतकांडातील पीडित तरुणी मागील ३ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देतेय. पुढील दीड महिनाही तिच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. पीडितेचा चेहरा भाजल्यामुळे तिला श्वासोच्छवास घेता येत नाहीए..ही केस लढण्यासाठी कुटुंबियांच्या मागणीनुसार आता पीडितेच्या बाजूनं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम लढणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितलंय. काल बर्न्ड स्पेशलिस्ट डॉक्टरांचं पथक घेऊन त्यांनीही पीडित तरुणीच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि सरकार सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय.
Continues below advertisement