Ramdas Tadas : भाजप खासदार रामदास तडस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत

Ramdas Tadas :  वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत दाखल झाले आहेत. तडस यांच्यासह माजी आंतरराष्ट्रीय पैलवान आणि प्रशिक्षक काका पवार आणि काँग्रेस नेते धवलसिंह मोहिते पाटील यांनीही अर्ज दाखल केला आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी भारतीय कुस्ती महासंघानं नुकतीच बरखास्त केली. त्यामुळं राज्य कुस्तीगीर परिषदेची ३१ जुलैला होणारी निवडणूक चुरशीची ठरणार आहे. या संघटनेच्या सरचिटणीसपदासाठी काका पवार यांच्यासह संदीप भोंडवे आणि योगेश दोडके हेही रिंगणात आहेत. वरिष्ठ उपाध्यक्षपदाच्या एका जागेसाठी धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह विजय बराटे आणि संजय शेट्ये यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. खजिनदारपदासाठी मात्र संजय शेट्ये यांच्या एकमेव अर्ज आला आहे. या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची तारीख २६ जुलै आहे. 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola