Wardha: विश्रामगृहाच्या भिंतीवर आकर्षक रंगरंगोटी, 32 शाळा 220 विद्यार्थ्यांचा सहभाग ABP Majha
Continues below advertisement
एरवी दुर्लक्षित राहणाऱ्या, कुणाचही लक्ष न जाणाऱ्या वर्ध्यातल्या सिव्हिल लाईन परिसरातील विश्रामगृहाच्या भिंती आता सर्वांचं लक्ष वेधून घेताहेत... कारण या भिंतीवर गांधीजींच्या जीवन कार्यावरची चित्र विद्यार्थ्यांनी कुंचल्यातून साकारलीत.. विद्यार्थ्यांनी काढलेली आकर्षक चित्रं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतायत.. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, संविधान दिनाचं औचित्य साधत वर्ध्यात भित्तीचित्र रेखांकन स्पर्धा घेण्यात आली.. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, सेंट्रल जीएसटी ऑडीट नागपूर, मुंबईतील सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्स तर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.. या स्पर्धेत ३२ शाळा, शिक्षकांसोबतच २२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला..
Continues below advertisement