Waqf Board Maharashtra : वक्फ बोर्डाला निधी देण्याबाबत राज्य सरकारचं स्पष्टीकरण :ABP Majha
Waqf Board Maharashtra : वक्फ बोर्डाला निधी देण्याबाबत राज्य सरकारचं स्पष्टीकरण :ABP Majhaराज्य सरकारनं वक्फ वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विश्व हिंदू परिषदेनं सवाल उपस्थित केला होता.. यावर आता राज्य सरकार स्पष्टीकरण दिलंय., वक्फच्या बळकटीकरणासाठी २०११ पासून अनुदान देण्यात येतं असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलं....केंद्र शासनाच्या वक्फ विषयक संयुक्त संसदीय समितीने २००७ मध्ये राज्याला भेट दिली असता तत्कालीन राज्य शासनाने वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याबाबत आश्वासन दिलं.. त्यानंतर २०११ पासून योजना सुरू केल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.
केंद्र शासनाच्या वक्फ विषयक संयुक्त संसदीय समितीने २००७ मध्ये राज्याला भेट दिली असता तत्कालीन राज्य शासनाने वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यास अनुसरून तत्कालीन राज्य शासनाने या मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याची योजना २०११ पासून सुरू केलेली आहे. या योजनेनुसारच वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी दरवर्षी मागणीप्रमाणे निधी अर्थसंकल्पित केला जातो, असे स्पष्टीकरण राज्य सरकारतर्फे देण्यात आले आहे.