VSI Probe: 'चौकशी हास्यास्पद, BJP आता Baramati ला टारगेट करतंय', Rohit Pawar यांचा हल्लाबोल

Continues below advertisement
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) चौकशीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यात मतभेद उघड झाले आहेत. 'ही चौकशी हास्यास्पद असून, ठाण्यानंतर आता BJP बारामतीकडे मोर्चा वळवत आहे,' असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, सरकारने चौकशी करायचीच असेल, तर आम्ही समोर आणलेल्या इतर अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची करावी. याउलट, राजू शेट्टी यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'जर कोणी काही घोटाळा केला नसेल, तर त्यांनी चौकशीला घाबरण्याचे कारण नाही,' असे म्हणत त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले असून, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola