Bhandara APMC Election:भंडारा जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं मतदान
abp majha web team
Updated at:
12 May 2024 12:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडारा जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं मतदान आज होत आहे. तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीचं ५८ संचालक पदासाठी मतदान सात मतदान केंद्रावर होत असून तब्बल अडीच वर्षाच्या गॅपनंतर या बाजार समितीची निवडणूक होत आहे. ही निवडणूक आगामी विधानसभेच्या निवडणुकीची पूर्व तयारीचा भाग म्हणून तिच्याकडं बघितल्या जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे आणि भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीत तीन वेगवेगळे पॅनल एकमेकांसमोर उभे आहेत. मोहाडी येथील मतदान केंद्रावरून निवडणुकीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी....