Voter List Row: 'निवडणूक आयोगाविरोधात वज्रमूठ!', Uddhav-Raj Thackeray एकत्र येत आयोगाला जाब विचारणार

Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेने (MNS) निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'आगामी निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात वज्रमूठ उगारली आहे.' मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदार या प्रमुख मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड यांच्यासह विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. काल झालेल्या बैठकीत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आज सकाळी अकरा वाजता पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत शेकापचे जयंत पाटील, अजित नवले आणि प्रकाश रेड्डी हे नेतेही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सर्व पक्षीय संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola