Voter List Row: 'Ashish Shelar घाबरलेत, त्यांचा तोल घसरलाय', Nitin Raut यांचा थेट हल्ला

Continues below advertisement
मतदार यादीतील (Voter List) घोळावरून काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाचं धाडजीनं बनून त्या ठिकाणी काम करत आहे', असा गंभीर आरोप नितीन राऊत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीच्या वक्तव्याचा दाखला देत केला आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत धार्मिक तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते घाबरल्यासारखे दिसतात, असे राऊत म्हणाले. मतदार नोंदणी ही जात किंवा धर्माच्या आधारावर होत नाही, असे सांगत शेलार यांच्या धर्माधारित वक्तव्याविरोधात आज निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. या तक्रारीत शेलार यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम आणि भारतीय दंड संहितेनुसार कायदेशीर कारवाई सुरू करण्याची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. दुसरीकडे, एकनाथ खडसे यांनीही निवडणूक आयोगावर सरकारच्या दबावाची शक्यता वर्तवली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola