Voter List Row : विरोधी पक्षांनी आरोप केलेल्या ठिकाणची चौकशी करण्याचे आदेश

Continues below advertisement
मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात (Voter List Irregularities) निवडणूक आयोगाने (Election Commission) चौकशीचे आदेश दिले असून, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी यावरून विरोधकांवर टीका केली आहे. 'काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, काँग्रेसचे पंतप्रधान होते तेव्हापासून या मतदार याद्यांचा घोळ आहे. मग त्यावेळी कोणाला जबाबदार पकडायचं?' असा सवाल करत म्हस्के यांनी जुन्या सरकारांच्या कार्यकाळाकडे बोट दाखवले आहे. नागपूरमध्ये (Nagpur) एकाच घरात २०० मतदार नोंदवल्याच्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, जयश्री मेहता आणि मोहन नंदा बिल्वा या महिलांची विविध मतदार याद्यांमधील डुप्लिकेट नावे हटवण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचा अहवाल आल्यानंतर तो आरोप केलेल्या नेत्यांना दिला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola