Voter List Row: 'निवडणूक आयोग वोट चोरी करतो', Nitin Raut यांचा सत्तापक्षाला मदत केल्याचा गंभीर आरोप
Continues below advertisement
काँग्रेस आमदार नितीन राऊत (Nitin Raut) यांनी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केले आहेत. 'तुमच्या आयोग वोट चोरी करतो आणि सत्तापक्षाला मदत करतो', असा थेट सवाल नितीन राऊत यांनी विचारला आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दुबार मतदारांवरून केलेल्या आरोपांना उत्तर देताना राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एखाद्या नागरिकाने मतचोरीचा आरोप केल्यानंतरही आयोग गप्प का आहे, अशी विचारणा त्यांनी केली. महाविकास आघाडीने मांडलेली भूमिका चुकीची ठरवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत, असेही ते म्हणाले. या प्रकरणी आपण निवडणूक आयोग आणि न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा नितीन राऊत यांनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement