Zero Hour : 'आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला
Continues below advertisement
शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातील मतदार यादीत सुमारे १९,००० बोगस मतदार असल्याचा दावा केल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. ठाकरे यांनी एका सादरीकरणाद्वारे मतदार याद्यांमधील घोळ समोर आणण्याचा प्रयत्न केला. 'आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये', असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्या सादरीकरणाची तुलना राहुल गांधींच्या शैलीशी केली. या आरोपांवर उत्तर देताना शिवसेना (UBT) नेते अनिल परब यांनी भाजपवर प्रतिहल्ला केला. 'चूक दाखवणे हा गुन्हा आहे का?' असा सवाल करत, निवडणूक आयोगाच्या कारभारावर मुख्यमंत्री का उत्तर देत आहेत, असा प्रश्न परब यांनी उपस्थित केला. 'त्यांना एवढी मिरची का लागली?' असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement